51 लोकप्रतिनिधींना ईडीकडून अटक

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील 51 आजी-माजी खासदार आणि 71 आमदारांना सक्तवसुली संचालनालयाने (इडी) विविध प्रकरणांमध्ये आरोपी केले आहे. आजी माजी खासदार आणि आमदारांविरुद्ध सीबीआयने नोंदविलेले 121 खटले प्रलंबित आहेत. अमॅकस क्युरी म्हणजेच न्यायालयीन मित्राच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला आज ही माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची गुरुवारी (दि. 16) सुनावणी होणार आहे.

अश्‍विनीकुमार उपाध्याय विरुद्ध भारत संघराज्य या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या संदर्भात प्रलंबित प्रकरणांच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी ईडी आणि सीबीआयने एक देखरेख समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

ईडीच्या वतीने अमॅकस क्युरी म्हणून काम पहाणारे ज्येष्ठ वकील विजय हंसरिया यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या वस्तुस्थितीदर्शक अहवालात नमूद केले आहे की 51 आजी-माजी खासदारांना इडीने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीएमएलए) आरोपी म्हणून निश्‍चित केले आहे.

Exit mobile version