। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथे दि. 31 ऑक्टोबर रोजी आरोपित रा.जलपाडा- कामार्ले, ता. अलिबाग स्वतःचे गोडाउन तसेच दुकानात मा.न्यायालयाने प्रतिबंधित केलेले बेरीयम सॉल्ट मिश्रीत फटाके तयार करून विक्री करीत असताना मिळून आला. तसेच दुकानाचे बाजूस असलेल्या बंद खोलीमध्ये सुमारे सहा ते सात वर्षापुर्वीचे सुतळी बॉम्ब फटाके बाळगले स्थितीत मिळून आले. सदर गुन्ह्यातील एकूण 52 हजार 891 रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोसई/श्री.जाधव हे करीत आहेत.