55 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महिलेला जंगलात ओढून नेत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडा येथे ही घटना घडली आहे. 55 वर्षीय पीडित महिला गवत कापत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला ओढत जवळच्या जंगलात नेण्यात आले, तिथे आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींकडून सुटका होताच महिलेने कुटुंबाकडे धाव घेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय चाचणी केली. पीडितेला वैद्यकीय उपचार देण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आरोपी महिलेच्या ओळखीचा असून एकाच गावात राहणारा आहे. गुरांना चारण्यासाठी आरोपी तिथे आपल्या तीन मित्रांसोबत आला होता. इतर तिघांची ओळख पटवली जात आहे.

Exit mobile version