५५३ सदस्यपदासाठी, तर सरपंचपदासाठी १०५ उमेदवार रिंगणात

| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील 18 ग्रामपंचायतच्या निवडणुका दि. 18 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्यपदाच्या 164 जागांसाठी 553 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी 18 जागांसाठी 105 उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. 18 ग्रामपंचायतपैकी घारापुरी ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांनी पराभवाच्या भीतीने उमेदवारी अर्ज दाखल न केला नाही. त्यामुळे घारापुरी ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणानंतरची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाणजे ग्रामपंचायतच्या 7 जागांसाठी 21 तर सरपंच पदासाठी 5, डोंगरी ग्रामपंचायत 7 जागांसाठी 25 तर सरपंच पदासाठी 6, घारापुरी ग्रामपंचायत 7 जागांसाठी 7 तर सरपंच पदासाठी 1 यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. रानसई 7 जागांसाठी 19 तर सरपंचपदासाठी 3, पुनाडे 7 जागांसाठी 19 तर सरपंचपदासाठी 8, सारडे 7 जागांसाठी 25 तर सरपंच पदासाठी 6, नवीन शेवे 9 जागांसाठी 36 तर सरपंच पदासाठी 9, धुतुम 9 जागांसाठी 28, तर सरपंच पदासाठी 5, करळ 9 जागांसाठी 24 तर सरपंच पदासाठी 5, कळंबुसरे 9 जागांसाठी 22 तर सरपंचपदासाठी 3, बोकडविरा 9 जागांसाठी 42 तर सरपंच पदासाठी 9, वशेणी 9 जागांसाठी 22 तर सरपंचपदासाठी 2, पागोटे 9 जागांसाठी 33 तर सरपंचपदासाठी 8, पिरकोन 11 जागांसाठी 37 तर सरपंचपदासाठी 4, जसखार 11 जागांसाठी 44 तर सरपंचपदासाठी 6, चिरले 11 जागांसाठी 54 तर सरपंचपदासाठी 8, भेंडखळ 11 जागांसाठी 48 तर सरपंचपदासाठी 9, नवघर 15 जागांसाठी 47 तर सरपंचपदासाठी 8 असे एकूण 164 सदस्य पदाच्या जागांसाठी 553 उमेदवार तर सरपंच पदाच्या 18 जागांसाठी 105 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसांतरच ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version