| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील 73ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 73 पैकी 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 51 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका अटळ आहेत.
तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 217 तर सदस्य पदासाठी 961अर्ज दाखल झाले होते, मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 51 ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची खुटील ,कोंझर ,पूनाडे तर्फे नाते, वाळण खुर्द, दादली ,नागाव, पिंपळवाडी, रूपवली, मोहत, निगडे, दापोली, राजीवली, कुर्ले, चिंभावे मोहल्ला, पाचाड, रावतळी, शिरसवणे, वडवली, केंबुर्ली, फाळकेवाडी, चांभार खिंड, कुंबळे, या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मात्र कुंबळे आणि फाळकेवडी या दोन ग्रामपंचायती मध्ये सरपंच पदा साठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नाही.
सरपंच पदासाठी 73 ग्रामपंचायत मधून 217 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते तर सदस्य पदांसाठी 961 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 217 पैकी 97 लोकांनी माघार घेतली तर सदस्य पदासाठी 961 जणांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 226 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले सद्यस्थितीमध्ये सरपंच पदासाठी 120 जण तर सदस्य पदासाठी 735 जण नशीब आजमावत आहेत.