| पेण | प्रतिनिधी |
पेण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील 19 वर्षांखालील मुला-मुलींमधील प्रतिभावंत क्रिकेट खेळाडूंचा शोध घेण्यासाठी ‘टॅलेंट हंट’ उपक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर करण्यात आले आहे.
या टॅलेंट हंट उपक्रमाच्या माध्यमातून पेण तालुक्यातील गुणवंत क्रिकेटपटूंची निवड करण्यात येणार असून, निवड झालेल्या खेळाडूंना पेण स्पोर्ट्स असोसिएशनच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर वयोगटानुसार 14, 16 आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींचे संघ तयार करण्यात येणार आहेत. हे संघ रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होतील. पेण तालुक्यातील युवा क्रिकेटपटूंमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांना योग्य मार्गदर्शन व दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देणे तसेच जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणावे. तसेच 200 रुपये प्रवेश शुल्क भरून आपली नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शिंदे (9527608080), देवा पाटील (9226951176), मनोहर अहिर (9970097650) आणि दिनेश सावंत (9423379603) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







