| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकसाठी गेल्या महिन्याभरापासून राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. राजकीय पक्षांनी सभा आणि प्रचाराचा धडाका लावला होता. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी पार पडले. यावेळी उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षफुटीनंतर ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे गेले. या निवडणुकीची पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - 61.95 टक्के, अकोला- 56.16, अमरावती-58.48, भंडारा- 65.88, बुलढाणा-62.84, चंद्रपूर- 64.48, धुळे- 59.75, औरंगाबाद- 60.83, बीड- 60.62, गडचिरोली-69.63, गोंदिया-65.09, हिंगोली- 61.18, जळगाव- 54.69, जालना- 64.17, नंदुरबार- 63.72, नाशिक -59.85, उस्मानाबाद- 58.59 टक्के, पालघर- 59.31, यवतमाळ- 61.22, कोल्हापूर- 67.97, लातूर 61.43, मुंबई शहर-49.07, मुंबई उपनगर-51.76, नागपूर- 56.06, नांदेड - 55.88, परभणी- 62.73, पुणे- 54.09, रायगड- 61.01, सातारा- 64.16, रत्नागिरी- 60.35, सांगली- 63.28, वाशिम -57.42, सिंधुदुर्ग- 62.06, सोलापूर -57.09, ठाणे- 49.76, वर्धा - 63.50 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.







