तीन प्रवाशी गंभीर तर सहा प्रवाशी किरकोळ जखमी
| खोपोली | प्रतिनिधी |
मुबंई-पुणे एक्सप्रेसवेवर आज रात्री टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरी अरुण ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक दिल्याने बस खड्यात पडून भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोमधील तीन जण गंभीर जखमी तर बसमधील सहा प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
मुबंई – पुणे एक्सप्रेसवेवरून टेम्पो पुण्याहून मुबंईकडे जात असताना तो बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील अरुण ट्रॅव्हल बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बस लोखंडी बॅरियर तोडून खड्यात पलटी झाली, यात टेम्पो मधील शाहीर मोहम्मद, इरफान अयुब खान, कैफ शेख महम्मद इनामदार हे गंभीर जखमी झाले आहेत, तर बस मधील एम रविचंद्रण चालक,( 42 )भाऊसाहेब कदम (42) इंद्रजित काशीद(09 )स्मिता माने (45 ) आकाताई काशीद (55 )सुभाष काशीद (42) सोलापूर हे किरकोळ जखमी झाले आहेत. या टेम्पोमधील गंभीर जखमींना एमजीएम रुग्णालय तात्काळ दाखल करण्यात आले आहेत, तर बसमधील जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालय दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, मृत्युजय टीम, अपघातग्रस्त टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत बसमधील अडकेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.