। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे १ लाख ७२ हजार ४३३ नवे रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या नव्या संख्येत ६.८ टक्क्यांची वाढ झाली. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. आतापर्यंत जवळपास १६७.८७ कोटी डोस देण्यात आले आहे.
गेल्या आठवड्याभरात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. रिकव्हरी रेट हा ९५.१४ टक्के इतका झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे १५ लाख ३३ हजार ९२१ रुग्ण आहेत.





