। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा काही भाग कोसळून घडलेली दुर्घटना ताजी असताना आता पुन्हा एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर सुरू असलेल्या ब्रिजच्या कामावेळी ही घटना घडली. लोखंडी तुकडा थेट फॉर्च्युनर कारवर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, कारचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईतल्या रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुऱक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.






