जिल्ह्यात 60 कोरोना रूग्ण;49 कोरोना मुक्त

जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गुरुवारी रायगड जिल्ह्यातील 12 तालुक्यामध्ये 60 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 224 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गुरुवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 12, पनवेल ग्रामीण 6, उरण 4, खालापूर 8, कर्जत 4, पेण 8, अलिबाग 9, माणगाव 2, रोहा 1, श्रीवर्धन 1, म्हसळा 1, महाड 1 आणि पोलादपूर 3 असे 60 रुग्ण आढळले. तसेच पनवेल मनपा क्षेत्रातील 12, पनवेल ग्रामीण 9, उरण 2, खालापूर 5, कर्जत 1, पेण 11, अलिबाग 3, मुरुड 1, माणगाव 3, रोहा 2 अशा एकूण 49 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 22 हजार 510 झाली आहे. यापैकी 2 लाख 17 हजार 580 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 706 झाला आहे. सद्यस्थितीत 224 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version