• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

Krushival by Krushival
May 16, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
239
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबागमध्ये अत्याधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरची सुरुवात

| अलिबाग | संतोष राऊळ |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळत असताना, आता स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या वाटाही खुल्या होत आहेत. त्यामुळे रायगडचा तरुण ‌‘गगनभरारी‌’ घेण्यासाठी सज्ज होत आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात शनिवारी (दि.16) आधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरचे उदघाटन करण्यात आले असून, एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे केंद्र मोठी संधी ठरणार आहे.

पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अलिबाग येथील पीनपी नाट्यगृहात विशेष रोजगार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी आयईएसपी संस्थेचे प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी खन्ना यांनी तरुणांना प्रेरित करताना सांगितले की, देशात विमानतळ आणि एअरलाईन्स उद्योग झपाट्याने विस्तारत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अलिबाग आणि रायगड परिसराचे महत्त्व आणखी वाढले आहे. येत्या काळात हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. मात्र, या संधी मिळवण्यासाठी स्थानिक युवकांनी स्वतःला कौशल्यपूर्ण बनवणे अत्यावश्यक आहे.

ते पुढे म्हणाले, आज ग्रामीण भागातील अनेक युवकांमध्ये क्षमता आहे, पण योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचा अभाव आहे. म्हणूनच आम्ही हे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य प्रशिक्षण असेल तर रायगडातील युवक देशभरात आपली छाप पाडू शकतात.

यावेळी शेकाप महिला राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्थानिक युवकांच्या रोजगाराचा मुद्दा ठामपणे मांडला. जिल्ह्यातील तरूण बेरोजगार राहू नये, हीच माझी खरी इच्छा आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना योग्य दिशा आणि रोजगार मिळणे गरजेचे आहे. गावागावातील मुलांना मोठ्या शहरांत भटकंती करावी लागू नये म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, या प्रशिक्षण केंद्रामध्ये एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट ऑपरेशन, एअरपोर्ट मॅनेजमेंट, हॉस्पिटेलिटी, ग्राहक सेवा, हेल्थकेअर सपोर्ट, कॉर्पोरेट ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल्स, ग्रूमिंग आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार सहाय्यही देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी हे केंद्र करिअर घडविण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र रोजगार फोरमही तयार करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतच अनेक युवकांना विविध क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम फक्त प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून, युवकांना प्रत्यक्ष रोजगाराशी जोडण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी ग्रुपचे प्रमुख उद्योजक नृपाल पाटील, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, पाणीपुरवठा सभापती अनिल चोपडा,  प्रदीप नाईक, माजी जि.प. सदस्य द्वारकानाथ नाईक, राष्ट्रवादीचे ॲड. प्रवीण ठाकूर, माजी जि.प. सदस्य काका ठाकूर, शेकाप तालुका सरचिटणीस सुरेश घरत, शेकाप ज्येष्ठ नेते अनिल पाटील, ॲड. के.डी. पाटील, पंचायत समिती सदस्य अंजली पाटील, नगरसेवक अंकित बंगेरा, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, नागाव सरपंच हर्षदा मयेकर, आक्षी सरपंच रश्मी पाटील यांच्यासह शेकाप कार्यकर्ते, पदाधिकारी, एअरवॅट ग्रुपच्या रिजनल हेड दीप्ती वीरकर, आयईएसपी कंपनीची टीम आणि पीएनपी टीम आदींसह विद्यार्थी, पालक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण केंद्रामुळे अलिबाग, मुरुड, रोह्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराचे नवे दरवाजे खुले होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

पाटील कुटुंबियांसाठी शिक्षण, रोजगार जिव्हाळ्याचे
पाटील कुटुंबियांच्या चारही पिढ्यांसाठी शिक्षण आणि रोजगार हा एक फार जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी चरीचे आंदोलन केलेले, तेव्हा शेतकऱ्यांसह अनेकांना रोजगार दिला. तसेच स्व. दत्ता पाटील आणि  स्व. प्रभाकर पाटील यांनी कोएसो, पीएनपीसारख्या संस्था उभ्या केल्या. जिल्हा परिषदेत अनेक शिक्षकांना नोकऱ्या दिल्या. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी आरडीसीसी आणि अर्बन बँकसारख्या बँकिंग क्षेत्राची दालने उभी केली आणि अनेक जणांना नोकऱ्या दिल्या.आज नृपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्थां सुरू करून हजारो स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज या संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज अशी परिस्थिती आहे की, अनेक तरुणांच्या हातात पदवी आहे; पण रोजगार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून युवकांना थेट उद्योग आणि सेवा क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

युवकांसाठी उपलब्ध अभ्यासक्रम
एअर होस्टेस प्रशिक्षण
केबिन क्रू
एअरपोर्ट ऑपरेशन व मॅनेजमेंट
हॉस्पिटेलिटी आणि ग्राहक सेवा
हेल्थकेअर सपोर्ट
कम्युनिकेशन स्किल्स
व्यक्तिमत्त्व विकास आणि ग्रूमिंग
कॉर्पोरेट ट्रेनिंग
प्लेसमेंट सहाय्य
उद्यापासून प्रशिक्षण केंद्राची सुरूवात
पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईसपी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.17) गोंधळपाडा-वेश्वी येथील पीनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात अत्याधुनिक स्किल ट्रेनिंग सेंटरची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी विमानतळ क्षेत्रातील विविध नोकरींच्या संधीबाबत सविस्त माहिती दिली जाणार आहे. अनुभवी तज्ज्ञांकडून करिअर मार्गदर्शन, कौन्सिलिंग, शंका निरसन, थेट मुलाखती व प्राथमिक निवड प्रक्रियांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने युवकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील व आयईसपी कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

Related

Tags: alibagalibag newsindia newskrushivalkrushival marathi newskrushival newskrushival news appmaharashtramarathi newsnewsraigad newsSkills Training Centresocial media newssocial news
Previous Post

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

Next Post

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती!

Krushival

Krushival

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Next Post

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?