। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
तालुक्यातील मालगुंड येथे सुमारे 17 हेक्टर जागेमध्ये प्राणी संग्रहालय होत आहे. त्याच्या कंपाउंडचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समवेत सांमजस्य करार करण्यात आला आहे. एमआयडीसीकडून कर्जस्वरूपात उपलब्ध करून दिली जाणारी 60.75 कोटी रक्कम जिल्हा परिषदेला टप्प्याटप्याने फेडावी लागणार आहे. आशियाई सिंह, पट्टेरी वाघ, जंगली मांजर, लेपर्ड कट, पिसोरी हरीण, तरस आदी प्राण्यांचा समावेश आहे. प्रत्येक प्राण्यांसाठी सुरक्षित स्वतंत्र पिंजरा असणार आहे. पर्यावरण व वनविभागाच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून प्राण्यांची देखभाल केली जाणार आहे. मालगुंड येथे सुमारे 100 कोटींचे हे प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
प्राणी संग्रहालयाला 60 कोटी कर्ज
