सागरगडच्या आदिवासी रस्त्याला ६० लाख

| अलिबाग | वार्ताहर |
सागरगडच्या आदिवासी रस्त्यास ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.यासाठी पत्रकार बळवंत वालेकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. मागील महिन्यात अलिबाग येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात वालेकर यांनी सागरगड-माची आदिवासीवाडीच्या व्यथा मांडल्या.त्या ऐकून पालकमंत्री व्यतित झाले. लगेचच त्यांनी २० लाख रुपये खर्चास मंजुरी देऊन कार्यादेश काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास दिले. त्यामुळे या रस्त्याच्या कामास ठेकेदाराकडून सुरुवात झाली आहे. सदर रस्त्याच्या दुसर्‍या टप्प्यासाठी ४० लाख रुपये त्वरित मंजूर करावेत असा आदेश पालकमंत्र्यांनी दिला आहे.

त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले गेले. आदिवासीवाडीच्या रस्त्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी मिळविण्यात पत्रकार बळवंत वालेकर यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे आदिवासी नेते भगवान नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version