। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील जेजे रुग्णालयातील 61 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून ही माहिती एएनआयला देण्यात आली आहे. आधीच निवासी डॉक्टरांची संख्या कमी असून कोरोनामुळे अनेकजण कर्तव्यावर नसताना लागण झाल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी व्यक्त केली आहे.
पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नीटचे समुपदेशन रखडल्याने 27 नोव्हेंबरपासून देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देशातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले होते.
डॉक्टरांची कमतरता असल्याने ओपीडी सुरळीत चालत नाही. गेल्या 48 तासात 120 डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय अजून काही जणांना लागण होऊन ही संख्या वाढण्याची भीती आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या संचालक मंडळाने दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी डॉक्टर अविनाश दहिफळे यांनी केली आहे.