उद्यापासून 31 जुलैपर्यंत 62 रेल्वे गाड्या रद्द

सोलापूर, पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग अन् ट्रॅफिक ब्लॉक

| मुंबई | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंडमध्ये नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे 29 ते 31 जुलैपर्यंत तब्बल 62 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. अनेक गाड्या पुणे-मिरज-कुर्डूवाडी, गुंताकल-बेल्लारी-हुबळी-मिरज-पुणे आणि मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज या मार्गांऐवजी पर्यायी मार्गावर धावणार आहेत.

सोलापूर, पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग अन् ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए केबीन दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे पुण्याला जाणार्‍या गाड्यावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. दरम्यान, तुम्ही जर या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणार असाल तर तुम्हाला तुमच्या ट्रेन्सची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळं प्रवास करण्यापर्वी रेल्वेचं वेळापत्रक तपासा आणि मगच घराबाहेर पडा, अन्यथा त्रासाला सामोरे जाले लागेल.
29 जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या?

29 जुलै रोजी 17614 हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस, 12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, 114019, 1409 1400 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01511 /01512 पुणे-बारामती-पुणे डीएमयू, 01525 पुणे-दौंड एमएमयू, 01461/01462 सोलापूर-दौंड-सोलापूर डीएमयू, 01539 -पुणे , 01528 बारामती-पुणे मु, 01533 पुणे-दौंड , 01532 बारामती-दौंड , आणि 01487/01488 पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

30 जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या?
1417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे , 11421 हडपसर-सोलापूर , 12169/12170 पुणे-सोलापूर 4019 एक्सप्रेस दौंड-निजामाबाद , 11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती , 01522 हडपसर-दौंड , 01526 बारामती-पुणे , 01525 बार पुणे-दौंड पॅसेंजर, 01525 बारामती , 01525 01527 दौंड-बारामती डीएमयू, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01448/ 01488 पुणे-हरंगुळ-पुणे स्पेशल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
31 जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या?
11417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे , 12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 1999 11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती , 01522 हडपसर-दौंड , 01526 बारामती-पुणे , 01525 पुणे-दौंड मेमू पॅसेंजर, 01512 बारामती-दौंड-दौंड-बारामती 01525 , 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01487/ 01488 विशेष.
Exit mobile version