पनवेलमधून ६२ वर्षीय वृद्ध बेपत्ता

। पनवेल । वार्ताहर ।
एक ६२ वर्षीय वृद्ध इसम फेरफटका मारून येतो असे सांगून घराबाहेर पडले ते अद्याप घरी न परतल्याने हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संजय हरिभाऊ खरे, रा. जे.के. पार्क सोसायटी, पनवेल, रंग सावळा, उंची 5 फूट 2 इंच, चेहरा उभट, नाक लांब व सरळ, केस काळे असून, उजव्या हाताच्या मनगटात लाल पिवळ्या रंगाचा दोरा, गळ्यात काळ्या रंगाची साधी माळ आहे, तसेच उजव्या मांडीवर भाजलेली खून, अंगात पिवळ्या रंगाचा हाफ टीशर्ट, निळ्या रंगाची बर्मोडा हाफ पॅन्ट घातली आहे, तसेच पायात काळ्या रंगाची चप्पल आहे. या इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 02227452333 किंवा पोलीस नाईक युवराज म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version