रायगड जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 623 नवे रुग्ण


दिवसभरात 642 रुग्णांची कोरोनावर मात
जिल्हा प्रशासनाची माहिती

रायगड जिल्ह्यात आज शनिवारी दि 12 जून रोजी कोरोनाच्या 623 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 642 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आज अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 104 रुग्णांची नोंद झाली आहे. तर पनवेल शहरात 95, पनवेल ग्रामीणमध्ये 58, खालापूरमध्ये 34, उरणमध्ये 27, पेणमध्ये 76, महाडमध्ये 59, कर्जतमध्ये 22, रोह्यात 57, मुरुडमध्ये 6, माणगावमध्ये 48, म्हसळ्यात 10, सुधागडमध्ये 10, पोलादपूरमध्ये 6, श्रीवर्धनमध्ये 10 तर तळा तालुक्यात 1 रुग्णांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे.
 
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 37 हजार 786 झाली आहे. यापैकी 1 लाख 28 हजार 135 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 336 वर गेला आहे. सद्यस्थितीत 6 हजार 315 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version