9 जणांचा मृत्यू; दिवसभरात 511 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज बुधवार दिनांक 7 जुलै रोजी कोरोनाच्या 634 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 9 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 511 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
आज पनवेल शहरात 137, पनवेल ग्रामीणमध्ये 90, अलिबागमध्ये 84, खालापूरमध्ये 45, उरणमध्ये 28, पेणमध्ये 60, महाडमध्ये 29, कर्जतमध्ये 24, रोह्यात 34, मुरुडमध्ये 11, माणगावमध्ये 52, म्हसळ्यात 4, सुधागडमध्ये 12, श्रीवर्धनमध्ये 18, पोलादपूरमध्ये 2, तळामध्ये 4 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 438 झाली आहे. यापैकी 1 लाख 41 हजार 976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 708 वर गेला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 754 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.