जिल्हा कारागृहातील 69 कैद्यांना कोरोनाची लागणं, कैद्यांना हलविले नेहुली कोव्हिडं सेंटरमध्ये

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आज अलिबाग तालुक्यात आढललेल्या 101 रुग्णांमध्ये अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील 69 कैद्यांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या या कैद्यांना नेहुली येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर 102 रुग्णांना बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा कारागृहातील काही कैद्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली त्यामुळे सर्व कैद्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात 69 कैद्यांचा कोरोना रिपोर्ट पोजेटीव्ह आला आहे. या कैद्यांना अधिक उपचारासाठी नेहूली येथे जिल्हा क्रीडा संकुलात सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात 17 हजार 356 संसर्गित रुग्ण आढळले असून त्या पैकी 15 हजार 653 रुग्ण उपचारा नंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर उपचारा दरम्यान 494 रुग्णांचा मृत्यू झाला. तर सद्यस्थितीत 1 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version