| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
69 हजार 100 रुपयांची विजचोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात नंदा हिरामण ठोकळ (रा.देवदगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोकळ यांनी मीटर बायपास करून मीटरचे वाचन व्यवस्थितरित्या होऊ न देता गेल्या बारा महिन्यांपासून वीज वितरण कंपनीची एकूण 3 हजार 365 युनिटची 69 हजार 100 रुपयांची वीज चोरी केली. म्हणून त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा खांदेश्वर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला.
पनवेलमध्ये 69 हजारांची विजचोरी
