झिराड येथील प्रकार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रेवस परिसरातील आरसीएफ जेटीवर क्षुल्लक कारणांवरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत होत 7-8 जणांनी चौघाजणांना झिराड येथे जाऊन काठी लाठी व लोंखडी रॉडने जबर मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, रेवस परिसरातील आरसीएफच्या जुन्या जेटीवरवरसोली कोळीवाडा, ता.अलिबाग हे आपल्या मित्र मैत्रीणींसोबत वाढदिवस साजरा करण्याकरीता गेले होते. वाढदिवस साजरा करून व त्याचे मित्र-मैत्रीण निघुन गेले. फिर्यादी व त्याचा मित्र हे उरलेला केक जमा करून गाडीच्या डिकीत भरत असताना एका इसमाने पॅशन प्रो गाडीवर गेलेल्या मुलाचे नाव काय असे विचारत तो मुलगा मला आता मला पाहीजे असे बोलुन शिवीगाळी सुरु केली. त्यानंतर आरेापीसह त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला हाताबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी आपल्या मित्रासह त्यांच्या गाडीने झिराड येथे आले. यावेळी वेदांत हॉटेलच्या समोर उभे असलेल्या त्यांच्या गावातील मित्रांकडे येवुन झालेली हकीगत सांगत असताना पुन्हा आरोपीत 1 ते 4 रा.अलिबाग असे चार चाकी गाडीने आले व त्यांचे सोबत बाईकवरून इतर 7 ते 8 जणांनी हातात काठी लाठी व लोंखडी रॉड घेवुन फिर्यादीसह त्यांच्या तिघा मित्रांना काहीएक न विचारता मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक म्हात्रे करीत आहेत.