सेने ८ तर राष्टवादी २
। खालापूर । वार्ताहर ।
खालापूर नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून सर्वच पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. खालापूर नागरपंचायतीमध्ये शेकापच्या ७ उमेदवारांचा विजय झाला आहे.
खालापूर नागरपंचायत प्रभाग क्र.१ मधून शंकर जोशी (शेकाप) मत – २९६, प्रभाग क्र.२ मधून संतोष जंगम (शेकाप) मत – २०४, प्रभाग क्र.९ मधून प्रणिता कदम (शेकाप) मत – १२२, प्रभाग क्र.१० मधून दीपाली जाधव (शेकाप) मत – ८३, प्रभाग क्र.१२ मधून दिनेश फरात (शेकाप) मत – ८१, प्रभाग क्र.१३ मधून महेश पवार (शेकाप) मत – ८६, प्रभाग क्र.१४ मधून गौरव शहा (शेकाप) मत – १८२ हे शेकापचे निवडून आलेले उमेदवार आहेत.