सर्वत्र उदंड प्रतिसाद, उमेदवारांच भवितव्य इलेक्ट्रॉनिक्स यंत्रात बंद
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (21 डिसेंबर) अमाप उत्साहात मतदान झाले.प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात सरासरी 74.20 टक्के मतदान झाले आहे. दि.22 जानेवारीला या मतदानाची मतमोजणी होणार आहे.102 पैकी 79 प्रभागात हे मतदान घेण्यात आले. यासाठी 233 उमेदवार उभे आहेत.
माणगाव, पोलादपूर, तळा, म्हसळा, खालापूर आणि पाली या नगरपंचायतींसाठी हे मतदान घेण्यात आले. पोलादपूरमध्ये सरासरी 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सहा नगरपंचायतींसाठी 34 हजार 639 मतदारांपैकी 25,703 मतदारांनी हक्क बजावला.
तळा 73.82 टक्के मतदान
तळा नगरपंचायतीची निवडणुसाठी 73.82 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
खालापुरात 84.46 टक्के मतदान
खालापुरात नगरपंचायतीच्या 16 जागांसाठी सरासरी 74.20 टक्के मतदान झाले.प्रभाग 1 89.1 टक्के,प्रभाग 2) रिक्त , प्रभाग 3 -89.73, प्रभाग 4) 91 23 टक्के, प्रभाग क्रमांक 84 .42 टक्के ,प्रभाग क्रमांक 6 92. 62 टक्के, प्रभाग 7 -90. 45 टक्के,प्रभाग क्रमांक 8-71 90 टक्के ,प्रभाग 9 – 80 88 टक्के, प्रभाग 10 ) 18टक्के, प्रभाग क्रमांक 11 -24टक्के, प्रभाग क्रमांक 12-85 .20 टक्के, प्रभाग क्रमांक 13 ,88 .34 टक्के, प्रभाग 14 -86 17 टक्के प्रभाग 15 ,84 08 टक्के, प्रभाग क्रमांक 16,90 .20 टक्के ,प्रभाग 17 .84 87 टक्के.एकूण मतदार 4968 झालेले स्त्री – 2105 ,पुरुष 2101 मतदान 4206 एकूण मतदान 84.66 टक्के मतदान झाले.
पाली -78.67 टक्के
पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला.78,67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.17 पैकी 13 प्रभागात ही निवडणूक झाली.एकूण 47 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.
माणगाव 70 .52 टक्के
माणगावमध्ये मंगळवारी 70.12 टक्के मतदानाची नोंद झाली.13 जागांसाठी एकूण 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पोलादपूर 71 टक्के
पोलादपूरमध्येही मतदानाला चांगला प्रतिसाद लाभला.71 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.13 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
म्हसळ्यात 68 टक्के
म्हसळ्यात 68 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.1 जागा बिनविरोध झाल्याने 12 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत.