रायगड जिल्ह्यात 749 रुग्ण; शुन्य मृत्यू

76 कोरोनामुक्त, जिल्ह्यात 2 हजार 563 सक्रीय रुग्ण
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 5 जानेवारी रोजी कोरोनाच्या 749 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तर दिवसभरात 76 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 563 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 5 तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नोंद झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी पनवेल महापालिका हद्दीत 475, पनवेल ग्रामीण 85, उरण 19, खालापूर 20, कर्जत 27, पेण 25, अलिबाग 41, मुरुड 3, माणगाव 8, रोहा 11, महाड 35 असे 749 रुग्ण आढळले. तसेच तळा, सुधागड, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या 5 तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 75 हजार 360 झाली आहे. यापैकी 1 लाख 68 हजार 207 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 590 वर गेला आहे. सद्यस्थितीत 2 हजार 563 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version