जिल्ह्यात 76 कोरोना रूग्ण; 295 कोरोनामुक्त

जिल्हा प्रशासनाची माहिती
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सोमवारी रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये 76 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 949 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सोमवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 50, पनवेल ग्रामीण 11, खालापूर 4, कर्जत 4, पेण 3, अलिबाग 2, माणगाव 1, श्रीवर्धन 1, असे 76 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 127, पनवेल ग्रामीण 38, उरण 7, खालापूर 14, कर्जत 10, पेण 47, अलिबाग 27 माणगाव 5, मुरुड 1, रोहा 11, सुधागड 1, श्रीवर्धन 5, आणि पोलादपूर 2 अशा एकूण 295 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 20 हजार 513 झाली आहे. यापैकी 2 लाख 14 हजार 938 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 702 झाला आहे. सद्यस्थितीत 949 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version