। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यात दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 83 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून 10 रुग्ण बरे झाले असून सध्या तालुक्यात 417 रुग्ण बाधित असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. या महामारीला पुन्हा डोके वर काढू न देण्यासाठी आपण सारेजण मिळून सामुदायिकपणे प्रयत्न करून आपल्या तालुक्यातून या महामारीला कायमचे हद्दपार करूया असे आवाहन तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.
सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट, बाबासाहेब नाजरे हायस्कुलतर्फे वक्तृत्व स्पर्धा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेंडसे ट्रस्ट पुणे व बाबासाहेब नाजरे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज आवास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभ सोमवारी (दि.10) बा. ना. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आवासमध्ये संपन्न झाला.
सदर बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून आ. सा. धो. र. हितवर्धक मंडळाचे उपसेक्रेटरी पी.जी.म्हात्रे यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्य वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून प्रथम तीन कार्यक्रमांना आकर्षक बक्षिसे, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट पुण्याचे पदाधिकारी मंदार वर्तक, शुभांगी वर्तक व अनुराधा कान्हेरे उपस्थित होते. त्यावेळी शुभांगी वर्तक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती म्हणून प्रकाश सिताराम राणे यांचा पेंडसे ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्य सुधामती घोडके यांनी केले. तर सुत्रसंचालन नमिता वर्तक व सृष्टी पुरो या अकारावी वणिज्य शोखेतील विद्यार्थ्यीनीने केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शिकारे यांनी केले.