रायगड जिल्ह्यात 83 रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू तर 112 कोरोनामुक्त, 4 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नव्याने 83 रुग्णांची नोंद झाली, उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यु झाला. तर 112 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
गुरुवारी नव्यानं जिल्ह्यात पनवेल मनपा 38, पनवेल ग्रामीण 13, पेण 4, अलिबाग 14, उरण 1, कर्जत 4, खालापूर 4, माणगाव 1, रोहा 1, मुरुड 1, श्रीवर्धन 1, महाड 1 असे एकूण 83 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. सुधागड, पोलादपूर, तळा, म्हसळा या 4 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. उपचारादरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 69 हजार 939 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 64 हजार 308 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version