जिल्ह्यात 84 रुग्ण; 4 जणांचा मृत्यू तर 102 कोरोनामुक्त, 6 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

जिल्हा प्रशासनाची माहिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी नव्याने 84 रुग्णांची नोंद झाली, उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यु झाला. तर 102 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मंगळवारी नव्यानं जिल्ह्यात पनवेल मनपा 36, पनवेल ग्रामीण 12, कर्जत 1, पेण 3, अलिबाग 26, उरण 1, मुरुड 2, रोहा 1, सुधागड 1, महाड 1 असे एकूण 84 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. खालापूर, माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर या 6 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. आज उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 69 हजार संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 63 हजार 292 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 344 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version