7 जणांचा मृत्यू तर 149 झाले कोरोनामुक्त जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आज बुधवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी नव्याने 129 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 149 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत तर मुरुड, तळा आणि पोलादपूर या तीन तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
बुधवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 43, पनवेल ग्रामीण 7, उरण 4, खालापूर 4, कर्जत 10, पेण 3, अलिबाग 37, माणगाव 2, रोहा 7, सुधागड 3, श्रीवर्धन 1, म्हसळा 1, महाड 7 असे एकूण 129 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर मुरुड, तळा आणि पोलादपूर या तीन तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच पनवेल मनपा क्षेत्र, आणि उरण तालुक्यात दोन तर अलिबाग, सुधागड आणि म्हसळा या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 63 हजार 262 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 57 हजार 319 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 111 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.