चित्रलेखा पाटील, सुरेश खैरे यांच्याकडून अभिनंदन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अनंत हिराजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी (दि.23) ही निवड प्रक्रिया बाजार समितीच्या कार्यालयातील सभागृहात पार पडली. सभापतीपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत अधिकारी यांनी जाहीर केले. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्याकडून अनंत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, अशोक म्हात्रे, स्वप्नील पाटील, अनंत पाटील, संजय पाटील, यशवंत भगत, सलीम तांडेल, संध्या पाटील, अशुप्रिता वेळे, गजानन झोरे, अमिताभ भगत, भास्कर भोपी, मुकेश नाईक, अर्चना हंबीर, सुभाष वागळे, प्रतिक पाटील, खलील तांडेल, सुडकोलीमधील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था रायगड यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या कार्यालयातील सभागृहात सभापतीपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि.24) सकाळी सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सभापतीपदासाठी अनंत पाटील यांनी अर्ज दाखल केला. या पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. अनंत पाटील यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. अनंत पाटील हे अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथील रहिवासी आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी वेगवेगळ्या संस्थेत काम केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कायमच त्यांनी आवाज उठविला आहे. अनंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.






