अलिबाग तालुक्यात मंगळवारी 86 कोरोनाचे रुग्ण


दिवसभरात 105 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग तहसीलदार यांची माहीती
अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात आज मंगळवारी 8 जून रोजी कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 105 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सुदैवाने एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
 
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 143 झाली आहे. यापैकी 404 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 12 हजार 577 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 162 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version