आज कोरोनाचे शून्य रुग्ण; 2 मृत्यू; दिवसभरात 162 रुग्णांची कोरोनावर मात
अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात आज मंगळवारी 19 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या एकाही नव्या रुग्णांची नोंद झाली नसल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र दुर्दैवाने आज दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 162 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आज अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 हजार 443 झाली आहे. यापैकी 602 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 19 हजार 704 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 137 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.