कोरोनाचे 87 नवे रुग्ण; 2 जणांचा मृत्यू

45 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रुग्णांची संख्या घटत असून आज गुरुवारी 8 जुलै रोजी कोरोनाच्या 87 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 45 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 हजार 012 झाली आहे. यापैकी 487 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 15 हजार 267 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 258 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version