70 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रुग्णांची संख्या घटत असून आज शुक्रवारी 30 जुलै रोजी कोरोनाच्या 50 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 70 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 हजार 515 झाली आहे. यापैकी 532 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 17 हजार 285 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 698 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.