| खोपोली | प्रतिनिधी |
शेअर बाजारात पैसे भरण्याचे आमिष दाखवून, तसेच दर महिना 10 टक्के दराने आकर्षक परतावा देण्याचे खोटे आश्वासन देणारा फरार आरोपी दिलीप बच्छाव, (वय- 30 वर्ष, रा, उंटवाडी नाशिक) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिलीप याने नऊ लाख रुपये स्विकारून ठरलेल्या मुदतीमध्ये मूळ रक्कम व परतावा न देता फसवणूक करून रकमेचा अपहार केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिलीप बच्छाव हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. खोपोली पोलिसांनी त्यास नाशिक येथील अंबड पोलिस ठाण येथे जावून ताब्यात घेतले.
सदरची कामगीरी पोलिस निरीक्षक शितल राऊत, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे यांनी केली आहे. तसेच ज्या नागरिकांची फसवणूक केली आहे त्यांनी तक्रार द्यावी, आवाहन केले आहे.
