रायगड जिल्ह्यातील रूग्ण संख्या निम्म्यावर 992 रुग्ण; 3 जणांचा मृत्यू

1 हजार 925 कोरोनामुक्त

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मागील 20 दिवस रायगड जिल्ह्यातील रूग्नसंख्या 2 हजार ते 1500 च्या वर गेली होती त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र रविवार दि. 23 जानेवारी रोजी कोरोनाच्या 992 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 925 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 हजार 037 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रविवारी पनवेल महापालिका हद्दीत 357, पनवेल ग्रामीण 125, उरण 37, खालापूर 99, कर्जत 62, पेण 62, अलिबाग 122, मुरुड 7, माणगाव 36, रोहा 48, तळा 3, सुधागड 2, श्रीवर्धन 13, म्हसळा 15, पोलादपूर 3 तर महाड 32 असे 992 रुग्ण आढळले. उपचारादरम्यान अलिबाग तालुक्यातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 07 हजार 389 झाली आहे. यापैकी 1 लाख 90 हजार 727 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 625 वर गेला आहे. सद्यस्थितीत 12 हजार 037 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version