| नेरळ | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जाहीर झालेल्या मेरी मिट्ठी मेरा देश या उपक्रमाचे क्रांती दिनी शुभारंभ करण्यात आला. मानिवली येथे हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकात आयोजित करण्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात तसेच हुतात्म्यांना अभिवादन या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. आ.महेंद्र थोरवे यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. त्याचवेळी राष्ट्रध्वज फडकावून क्रांती दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे,तालुका तहसीलदार शीतल रसाळ,पंचायत समितीचे प्रशासक चंद्रकांत साबळे,शिक्षक अधिकारी संतोष दोंड, सरपंच तुषार गवळी, माजी सभापती राहुल विषे, माजी उपसभापती अरविंद पाटील, यांच्यासह कर्जत तालुक्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते.