| कर्जत | वार्ताहर |
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कर्जत तालुका आदिवासी समन्वय समितीच्यावतीने प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रांत, तहसील कार्यालयावर संघटनेच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुका आदिवासी समन्वय समितीच्या प्रांत आणि तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, सदर निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढून अत्याचार करण़ाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, मणिपूर येथील खऱ्या आदिवासीना संरक्षण देण्यात यावे, शांतता प्रस्थापित करावी. कर्जत तालुका आदिवासी समन्वय समितीच्या माध्यमातून मणिपूर घटनेचा निषेध करत असल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविणे. आदिवासी सामाजाला समान नागरी कायद्यातून वगळण्यात यावे इर्शाळवाडीचे तात्काळ पुनर्वसन करावे. 9 ऑगस्ट जागतिक दिनाची सुट्टी जाहीर करावी, कर्जत तालुक्यातील वनविभागाच्या जाचक अटी शिथील आदिवासी वाड्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कर्जत तालुक्यात पैसा कायदा लागू करावा, कर्जत तालुक्यातील दरडग्रस्त गावासाठी उपाय योजना कराव्यात आदी मागण्याची मागण्याची पुर्तता करावी अशी मागणी निवेदनद्वारे केली आहे. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठया संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.