। माणगांव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील विळे आदिवासीवाडी येथे प्रेमसंबंधाच्या रागातून गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 5 आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विजय अनंत पवार यांच्या भावाचे आपल्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन पप्पू जाधव, काळू पवार, सचिन कोळी, सुनील जाधव, अलका जाधव आरोपीत यांनी एकत्र येत विजय पवार आणि कुटुंबियांना बेदम मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी व त्यांचे मामा गेले असता त्यांनाही मारहाण करुन दमदाटी केली. या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. जाधव करीत आहेत.