| मुंबई | प्रतिनिधी |
राहुल शेवाळे बदनामी प्रकरणात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे यावेळी उपस्थित होते.
मझगाव कोर्टाने हा जामीन मंजूर केलाय. 14 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ठाकरे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर होत.त्यांच्यावतीने त्यांच्या वकीलांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले.