हरकतीवर सुनावणीचे काम सुरु
| अलिबाग | प्रतिनिधी |
मुदत संपणाऱ्या अलिबाग तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींची निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या पारंपारिक पद्धतीने मतदार यादी बनवण्याचे काम अलिबाग तहसील कार्यालयात सुरु आहे. 10 ऑगस्टला प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या प्रारुप यादीवर खानाव, खिडकी, रेवदंडा, कामार्ले, चिंचवली, माणकूळे, किहीम, खंडाळे या ग्रामपंचायतीमधील 36 हरकतीचे अर्ज 21 ऑगस्टपर्यंत तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्या आहेत. या हरकतीवर सुनावणी घेण्याचे काम सुुरू केले आहे.25 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
मतदार यादी तयार करण्याचे काम अलिबाग तहसील कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होते. तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना एकाच ठिकाणी बसवून मतदार यांद्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारुप यादी प्रसिध्द झाली आहे. त्यावर हरकती आल्या आहेत. सुनावणीनंतर अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल.
विक्रम पाटील – तहसील, अलिबाग







