एसटीच्या गाड्यांचे आरक्षण फुल
| आगरदांडा | प्रतिनिधी |
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हजारो चाकरमानी दाखल झाले होते. गणेशोत्सवासाठी दाखल झालेले चाकरमानी पुन्हा नोकरी धंदयानिमित मुंबई , पुणे , कल्याण व अन्य शहरांमध्ये माघारी परंतु लागले आहेत.बाप्पाची मनोभावे पूजा करून बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर पुन्हा एकदा मिळेल त्या वाहनाने त्यामध्ये एसटी व खाजगी वाहनाने परतीच्या प्रवास चाकरमान्यांचा सुरू झाला आहे.
मुरुड परिवहन मंडळाच्या स्थानकांवर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.गाड्यांचे आरक्षित केलेले चाकरमनी तर काही तत्काळ तिकीट काढत आपला प्रवास करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.तालुक्यात गणेशोत्सवासाठी दाखल झालेल्या हजारो चाकरमान्यांसाठी परिवहन विभाग सज्ज झाला आहे. गणेशोत्सवासाठी परिवहन विभागाने जादा गाड्या, पनवेल, मुंबई, भाईंदर,बोर्ली, नालासोपारा व अन्य शहरांमध्ये जाणाऱ्या बस फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.