। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
गणेशोत्सवाचा सण जवळ आला असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशानाकडून मार्गदर्शक सूचना तथा संबंधित अद्यादेशाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. गणेशोत्सव 2021 साठी महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक आरएलपी 0621/प्र.क्र. 144/विशा 1 ब दिनांक 29 जून 2021 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
गणेशोत्सव सणासाठी जिल्ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नाही. तसेच अठरा वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांच्या प्रवेशास आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही. पण ज्या नागरिकांनी कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या नाहीत, त्यांनी जिल्हयात प्रवेशा करण्यापूर्वी 72 तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.