। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण शहरातील अतिथी हॉटेल येथे सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संवाद साधताना, तुम्ही धीर धरा, मराठा आरक्षण राज्य सरकारला द्यायला प्रवृत्त करीन, मराठा समाजाचा माझा जन्म झालेला आहे. त्यामुळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी शेवटपर्यंत लढेन, असा जबरदस्त आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी व्यासपिठावर आमदार प्रसाद लाड, माजी आमदार बाळ माने, डॉ. विनय नातू , नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी खासदार नीलेश राणे, श्याम सावंत , जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश कदम यांनी केले.