एसटीची मागची बाजू अडकल्याने प्रवासात खोळंबा
| आंबेत | वार्ताहर |
आंबेत येथील रो-रो सेवा सुरू असताना आंबेत दिशेकडून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या एसटी बसची मागची बाजू जेटीमध्ये अडकली. यामुळे मुंबईकर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. जवळजवळ एक तास या एसटीला काढण्यास वेळ लागल्याने पलीकडील रो-रो सेवा पाण्यातच एक तास ठप्प पडली होती, त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. आंबेत पुलाचे काम करीत असलेल्या पिलानी इन्फ्रा लिमिटेड या कंपनीने आपला हायड्रा मशीन दाखल करून ही बस काढली. यामुळे एक हात मदतीच्या अनुषंगाने ही बस काढण्यास मदत झाली, अन्यथा प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली असती.