माजी आ. पंडीत पाटील, ॲड. आस्वाद पाटील व चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष, श्री बहिरेश्वर मित्रमंडळ पुरस्कृत आणि इंडियाच्या सहकार्यातून नेहूली येथे कुस्त्यांचे सामने भरविण्यात आले होते. शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 27) रोजी या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, शिवसेना जिल्हा समन्वय अमिर ठाकूर, खंडाळेचे उपसरपंच अशोक थळे, माजी उपसरपंच विनोद पाटील, नेहुली-खंडाळे हायस्कूलचे सभापती नाशिकेत कावजी, ग्रामपंचायत सदस्य नरेश गोंधळी, तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयेंद्र भगत, विलास वालेकर, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष विलास वालेकर, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील, विजय थळे, पंढरीनाथ पाटील, नामदेव पाटील, प्रेमनाथ पाटील, सुदाम पाटील, अरुण पाटील,यशवंत पाटील,काशीनाथ पाटील, पंच प्रमोद भगत, वैभव मुकादम, संदीप मोरे, मिलींद भगत आदी मान्यवरांसह श्री बहिरेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी, सभासद, नेहुली येथील ग्रामस्थ, शेकाप कार्यकर्ते व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनाची कुस्ती नेहुली येथील मानस पाटील व पवेळे येथील वेद मानकुळे या दोन मल्लांमध्येे झाली. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत चुरशीची झाली. अखेर ही कुस्ती समान झाली. या दोन्ही मल्लांना माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या वीस वर्षाची परंपरा असलेल्या कुस्ती स्पर्धेत नेहुली, वाडगावसह आंदोशी अशा अनेक गावांतील आखाड्यांनी सहभाग घेतला होता. शेकडो मल्ल सहभागी झाले होते.
प्राण भगतचा सत्कार अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील प्राण जयेंद्र भगत या मल्लाने तालुका, जिल्हा तसेच मुंबई विभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण तर राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. त्याच्या या यशस्वी कामगिरीबद्दल श्री बहिरेश्वर मित्रमंडळाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. नेहुली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या वेळी हा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत केला.
कुस्तीसाठी होणार अद्ययावत व्यासपीठ नेहुली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात गेल्या अनेक वर्षापासून कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी अद्ययावत असे कुस्तीसाठी व्यासपिठ उभे केले जाईल, असे आश्वासन रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील यांनी दिले.