| रोहा | प्रतिनिधी |
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 3 टक्के रक्कमेची तरतूद असावी, आरोग्य सेवा अशा विविध बाबींची मागणी करतानाच तालुक्यातील वयाची 80 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना गौरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर, पांडुरंग सरफळे, शांताराम गायकवाड, सुरेश मोरे, डॉ. फरीद चिमावकर, अविनाश म्हात्रे, डॉ वेदक, मेहेंदळे सर, शैलजा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. वयाची 80 वर्षे पूर्ण झालेल्या हर्षद मंगलदास शहा, मानमल गोमाजी बोराणा, नारायण गणपत देशमुख, गणपत रामचंद्र खामकर, यशवंत गणपत ठाकूर, श्रीकांत नथुराम मोहरे, शिला सदानंद मोरे, शांताबाई वामन भोळे, उषा मधुकर केळकर यांचा आपल्या अनुभवसंपन्न जगण्यातून कुटुंब, समाज, आपलं गाव आणि आपल्या राष्ट्रासाठी योगदान दिल्याबद्दल गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश मोरे, प्रकाश पाटील, सुधाकर वालेकर, शरद गुढेकर, अनंत पाटणकर, नारायण पाटील, सुधाकर गडकरी, गजानन वैद्य, नंदकुमार भादेकर, गावडे गुरुजी, शैलजा देसाई, संजीवनी कडवेकर, संध्या मळेकर यांनी विशेष मेहनत घेतली.