| रसायनी | प्रतिनिधी |
पोलीस ठाणे हद्दीत वाशिवली गावात ठक्कर यांचे गोडाऊन आहे. याठिकाणी जाणारा रस्ता अक्षय विष्णू पाटील याने खोदल्याने त्या गोष्टीचा मनात राग धरुन संदीप शिंदे, ललित गायकर, अक्षय शिंदे, दीपक शिंदे, आदित्य शिंदे, गुरुनाथ पाटील ( खालापूर) या सहा जणांनी अक्षय याला हाताबुक्क्याने मारहाण करून दमदाट व शिवीगाळ केली. याबाबत अक्षय पाटीलने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रसायनी पोलीस ठाण्याचे वपोनि शत्रुघ्न माळी, सपोनि बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन चौरे हे अधिक तपास करीत आहेत.







