| आगरदांडा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचयत निवडणुका संपन्न होणार आहेत. याबाबतची आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. केंद्र स्तरावर इंडियाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस आय पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांची आघाडी असून, तीच आघाडी होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये असणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा इंडियाचा फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार पंडित पाटील यांनी केले.
एका कार्यक्रमासाठी ते मुरुड येथे आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रिता चौलकर, वावडुंगी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दशरथ वाजे, सागर कन्या सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले, माजी बंदर निरीक्षक बाळकृष्ण कासार, धर्मा हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंडित पाटील यांनी सांगितले की, याबाबत लवकरच पेण येथे 7 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय प्रतिनिधींची बैठक होणार असून, सर्वांची मने जुळणार आहेत. कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून निष्ठेने काम केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा यश मिळणार आहे. आपली आघाडी होणार असून, सर्वांनी झोकून काम केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा यश मिळणार आहे.
16 ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक विशेष दौरा आयोजित करण्यात आला असून, त्यांची जाहीर सभा होणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले आहेत. सध्याचे राज्यशासन हे फक्त कागदावर विकास करीत आहे. प्रत्यक्षात मात्र विकास होत नाही. विचारसरणी सोडून भाजप सरकारमध्ये सत्तेत सामील झाले व नंतर खुलासा करावयाचा आम्ही आमची धर्म निरपेक्षता सोडलेली नाही. जनता सर्व जाणकार आहे. कोणीही, असे समजू नये, केलेली कृती बरोबर आहे. निवडणुकीत याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंतभाई पाटील शेतकरी कामगार पक्ष बळकट करण्यासाठी मोठी मेहनत घेत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही सर्व पक्षीय मोट बांधण्यात यश आल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.
16 ऑक्टोबरला पवार-उध्दव येणार
16 ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक विशेष दौरा आयोजित करण्यात आला असून, त्यांची जाहीर सभा होणार असल्याचे संकेत यावेळी पंडित पाटील यांनी दिले आहेत. सध्याचे राज्य शासन हे फक्त कागदावर विकास करीत आहे. प्रत्यक्षात मात्र विकास होत नाही. विचारसरणी सोडून भाजप सरकारमध्ये सत्तेत सामील झाले व नंतर खुलासा करीत आहेत की आम्ही आमची धर्मनिरपेक्षता सोडलेली नाही. जनता सर्व जाणकार आहे. कोणीही, असे समजू नये, केलेली कृती बरोबर आहे. निवडणुकीत याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंतभाई पाटील शेतकरी कामगार पक्ष बळकट करण्यासाठी मोठी मेहनत घेत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही सर्वपक्षीय मोट बांधण्यात यश आल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.